Chara Tanchai… शेतीसोबत पशुपालन हा पूर्वापारपासून चालत आलेला जोडधंदा आहे. शेती उत्पादन निघाल्यानंतर पिकाचे उरणारे अवशेष चारा म्हणून वापरले जातात. त्यामुळे शेतकर्यांकडून शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाला प्रथम प्राधान्य दिले जाते. मात्र, रासायनिक खतांच्या वापर, पाण्यावर अवलंबून असलेली शेती, कमी अधिक पावसामुळे पिकांचे होणारे नुकसान या सारख्या प्रकारांमुळे चारा मिळणे कठीण झाले आहे, परिणामी जनावरांची प्रकृती खालावून दुग्ध उत्पादन घटत आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका तंत्रज्ञानाविषयी सांगणार आहोत. ज्याचा वापर करुन पशुपालक शेतकरी कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यात हिरवा आणि पौष्टीक चार्याचे उत्पादन घेवू शकतात. चला तर मग जाणून घेवूया… काय आहे हे तंत्रज्ञान.., कसा केला जातो वापर… आणि फायदे काय?
शेती मालाचे उत्पादन वाढावे यासाठी जसे पिकांना खते वगैरे देणे गरजेचे आहे, तसेच जनावरांची दुध देण्याची क्षमता वाढावी, यासाठी त्यांना हिरवा, पैष्टीक चारा मिळणे गरजेचे आहे. राज्यातील बर्याच भागात शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने जनावरांना पावसाळ्यातच हिरवा चारा उपलब्ध असतो. तर उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे हिरवा चारा उपलब्ध न झाल्याने जनावरांना कुट्टी, वाळलेले गवत यासारखा सुका चारा खायला मिळतो. त्यामुळे अनेक शेतकर्यांना चारा विकात घ्यावा लागतो. मात्र, या सर्वांवर हायड्रोपोनिक तंत्र उत्तम पर्याय ठरत आहे.