2023 च्या खरीप हंगामात पावसाने झालेल्या नुकसानी पोटी अग्रीम 25% प्रमाणे पिक विमा वितरण करण्यात आले. याद्वारे राज्यात विक्रमी 7000 कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला, तर यापैकी 4000 कोटींपेक्षा जास्त विमा रकमेचे वितरण पूर्ण झाले व उर्वरित रक्कमेचे वितरण सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे 2016 पासून आजपर्यंतची विमा वितरणाची ही आकडेवारी रेकॉर्ड ब्रेक असून यामध्ये अंतिम पीक कापणी अहवाला नंतर सरासरीच्या हिशोबाने येणारी पिक विमा रक्कम याची त्यात वाढ होणार असून अंतिम पीक कापणी नंतरचे पीक विम्याचे वितरण सुद्धा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितले.राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणून मी स्वतः पिक विमा कंपन्यांच्या सोबत सातत्याने बैठका घेऊन मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीचा विमा तातडीने वितरण केला जावा, यासाठी वारंवार पाठपुरावा करत असतो. त्यानुसार यावर्षी राज्यात अग्रीम मध्येच विक्रमी पिक विमा वाटप करण्यात आले आहे.असे ही ते म्हणाले.