कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.
सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप” या बाबीचा पुरवठा
करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. 14 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
कृषी यांत्रिकीकरण या अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.