कृषी विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा झाला करार
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तांत्रिक सहकार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. करारावर शासनाच्या वतीने प्रधान सचिव कृषी श्रीमती व्ही. राधा आणि कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने उप महासंचालक डॉ. एस. के. चौधरी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह आणि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील उपस्थित होते. या करारामुळे देशातील नामांकित संशोधन संस्थांनी बदलत्या हवामानात विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी विकसित केले तंत्रज्ञान महाराष्टातील शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल. तसेच शेतकऱ्यांना हवामान बदलानुसार निर्णय घेता यावा यासाठी कृषी हवामान सल्ला अचूकपणे देणे शक्य होईल .