मनरेगा कामगाराच्या 15 वर्षाच्या लहानग्याने शोधले पुराशी झुंज देणाऱ्या शेतीचे शाश्वत मॉडेल

ही यशोगाथा आहे केरळ राज्यातील पर्यटनस्थळ अलाप्पुझाजवळील कुट्टानाड येथील 15 वर्षांच्या लहानग्याची! त्याची आई मनरेगा कामगार. या शाळकरी मुलाने पुराशी झुंज देणाऱ्या शेतीचे शाश्वत मॉडेल विकसित केले आहे. त्याला केरळ सरकारच्या कृषी विभागाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शेतकऱ्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.

कुट्टनाड जिल्ह्यामधील मिश्राकरी येथील अर्जुन अशोक या पंधरा वर्षीय मुलाने केरळ राज्यातील कृषी विभागाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शेतकऱ्याचा पुरस्कार पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वारंवार येणाऱ्या पुरामुळे निर्माण झालेल्या आव्हानांशी झुंज देत त्याने शेतीतील यशोगाथा लिहिली. त्याच्या मॉडेलने सततच्या पुरामुळे शेतीत नुकसान सहन करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे.

लहान वयातच कळत-नकळत शेतीकडे अर्जुन लहान वयातच कळत-नकळत शेतीकडे ओढला गेला, त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तो म्हणतो, “अगदी लहान वयातच शेतीची पहिली पायरी मी आईकडून शिकलो. मनरेगा कामगार असलेल्या माझ्या आईने माझी शेतीची आवड ओळखली आणि मला प्रोत्साहन दिले. मी वयाच्या दहाव्या वर्षीच छोट्या प्रमाणात का होईना, पण स्वतः भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली.”

Share
  • Related Posts

    आदिवासी महिला शेतकरी झाल्या कृषी उद्योजक ; आता कोट्यावधी रुपयांचा शेती व्यवसाय

    Share
    Read more

    पडीक जमिनीत दोघींनी नैसर्गिक शेतीतून फुलवला लोकबगीचा !

    Share
    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेतकऱ्यासाठी खुशखबर 5 ऑक्टोबरला पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण

    • October 3, 2024

    अखेर मुहूर्त ठरला

    • September 18, 2024

    शेतकऱ्यासाठी खुशखबर

    • September 8, 2024

    कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर

    • September 2, 2024

    कापूस सोयाबीन आणि कांद्याच्या प्रश्न केंद्र राज्याच्या पाठीशी; केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण

    • August 21, 2024

    परळीच्या कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांचा होणार फायदा

    • August 21, 2024