जगभरातील तमाम शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता 15 दिवसात शेती उत्पादन डबल होऊ शकेल. विश्वास बसणार नाही, पण “विद्युत वाहक माती” विकसित करून शास्त्रज्ञांनी कमाल केली आहे. या नव्या अविष्काराविषयी आपण जाणून घेऊ.
शास्त्रज्ञांनी ही जी “विद्युत वाहक माती” विकसित केली आहे, ती 15 दिवसात सरासरी 50 टक्के जव/सत्तू (बार्ली) रोपांची वाढ करू शकते, असे प्राथमिक संशोधन निष्कर्षातून समोर आले आहे. हा प्रयोग सध्या मातीविरहित शेतीच्या हायड्रोपोनिक्स तंत्रात यशस्वी झाला आहे. या हायड्रोपोनिक्स शेतीत वापरली जाणारी वनस्पतीची मुळे ज्या मातीत आधी उगवली जातात, त्या नवीन लागवडीत मातीला सब्सट्रेटद्वारे विद्युतीयरित्या उत्तेजित केली जाते.
स्वीडनमध्ये केले गेले अभिनव संशोधन
स्वीडनमधील लिंकोपिंग विद्यापीठात हे अभिनव संशोधन केले गेले आहे. या संशोधनातील सहयोगी प्राध्यापक एलेनी स्टॅव्ह्रिनिडो यांनी सांगितले की, “जगाची लोकसंख्या वाढत आहे आणि आपल्याकडे हवामानातील बदल देखील झपाट्याने आहेत. त्यामुळे केवळ आधीच अस्तित्वात असलेल्या कृषी पद्धतींनी आम्ही जगाची अन्नधान्याची मागणी पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे अधिक उत्पादनक्षम अशी नवी लागवड तंत्र शोधून काढणे आवश्यक आहे.”