सरकारचे बदलते धोरण आणि चांगले उत्पादन करूनही मालाला योग्य भाव मिळत नसल्याने हैराण झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता साठवणुकीत कांदा खराब होण्याची कटकटच मिटली आहे. भाभा अणू संशोधन केंद्र BARC आणि ‘इन्फ्राकूल’ कंपनीचे हे नवीन तंत्रज्ञान काय आहे ते आपण जाणून घेऊया. प्रत्यक्ष संबंधित तज्ञांना भेटून त्यांच्याकडून या नव्या तंत्राची माहिती मिळवायची असेल तर आपण प्रमिला लॉन्स, पिंपळगाव बसवंत येथे 12 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित होत असलेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला जरूर भेट द्या.
‘इन्फ्राकूल’ कंपनीच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे जेव्हा बाजारात कांद्याला चांगला भाव असेल तेव्हाच तो विक्रीला बाहेर काढता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे व्यापारी, कमिशन एजंट, आडते-दलालांचा नव्हे तर थेट शेतकऱ्यांचाच मोठा फायदा होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणार आहे. भाभा संशोधन केंद्र म्हणजेच ‘बीएआरसी’ने विकसित केलेल्या या नव्या तंत्रज्ञानासाठी पायाभूत नियंत्रित उभारणी करून ‘इन्फ्राकूल’ कंपनीने यशस्वी चाचणी पार पाडली.