पीक विमा भरण्याचा उद्या शेवटचा दिवस
निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच पावसाच्या अनियमितपणामुळे गेल्या काही वर्षात शेती आणि शेतकरी अडचणीत सापडला आहे . मात्र अशावेळी पंत प्रधान पिकाविमा योजना शेतकऱ्यांसाठी मदतगार ठरत आहे . राज्य सरकारने या योजनेत एक पाऊल पुढे उचलत शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपया भरून त्यांच्या खरीप पिकाचा विमा काढण्याची सोय करून दिलेली आहे. आतापर्यंत राज्यात शेतकऱ्यांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिलेला असून यंदा एक कोटी .४०लाखाच्या जवळपास विमा अर्ज दाखल झाले आहेत. पीक विमा भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे .त्यामुळे पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांना उद्या शेवटच्या दिवशी एक रुपया भरून आपल्या खरीप पिकास विमा संरक्षण देता येईल .