१. कोकण विदर्भात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही प्रमाणात उघडीप मिळण्याची शक्यता.
दिनांक ३० जुलै ते ३ ऑगस्ट २०२४
२. ढगाळ हवामानामुळे भातावर बुरशीजन्य करपा नियंत्रणासाठी ट्रायसायक्लोझोल 75 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी १० ग्रॅम प्रति १० लिटर फवारावी.
३. तुरीच्या लागवडीनंतर ४५ दिवसांनी वरून ५ सेंटीमीटर अंतरावर शेंडे खुडणी करावी.
४. सोयाबीन/कापूस पिकात मर रोग साठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (50 डब्ल्यू पी) २.५ ग्रॅम किंवा कार्बनडाझिम (50 डब्ल्यू पी) २ ग्रॅम + युरिया १० ग्रॅम+
पांढरे पोटॅश १० ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
५. तुर पीक पिवळे पडल्यास ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड -२ ,५० ग्रॅम किंवा ५०मिली अधिक १९:१९:१९ खत १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
६. मूग व उडीद पिकात भुरी रोगाची लागण दिसताच डीनोकॉप १० मिली किंवा गंधक ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.