पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी १४ खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर किंमत मिळावी यासाठी सरकारने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत नाचणी (प्रति क्विंटल ५९६ रुपये), कापूस (प्रति क्विंटल ५८९ रुपये) आणि तीळ (प्रति क्विंटल ५७९ रुपये) साठी करण्याची शिफारस केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ हंगामासाठी १४ खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती (MSP) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.यात सोयाबीनला 5328 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. गतवर्षी सोयाबीनला 4892 रुपये होता. त्यात 436 रुपये वाढ करण्यात आला आहे.केंद्र सरकारने कापसाच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे गत हंगामात लांब धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल 7551 भाव होता. त्यात पाचशे एकोणासाठ रुपये भरीव वाढ करून 8110 रुपये कापसाला हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

