शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या साठी लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपसामध्ये वाटणी करण्यासाठी एकूण रेडीरेकनरच्या एक टक्के किंमत यापूर्वी मोजावी लागायची. आता फक्त 500 रुपयांमध्ये ही वाटणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आधी शेतीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी मोठी रक्कम मोजावी लागायची.ती आता या निर्णयामुळे वाचणार आहे.


