महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार

महाराष्ट्र राज्याला 2024 सालचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार जाहीर झाला आहे.महाराष्ट्र शासनाने मागील वर्षात पर्यावरणाच्या संरक्षणासह अन्नसुरक्षा, सर्वात मोठी बांबू लागवड, तृणधान्य अभियान, औष्णिक वीज निर्मितीत बायोमास चा वापर यांसारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्प, पंतप्रधान किसान सन्मान निधी दुप्पट करणारे देशातील पहिले राज्य, त्याचबरोबर 4.63 लाख शेतकऱ्यांना नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांचे वितरण, सूक्ष्म बाजरी कार्यक्रम, डाळींच्या उत्पादनात देशात अव्वल स्थान, तसेच एक रुपयात पिक विमा योजना राबवणारे देशातील एकमेव राज्य असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. यामुळे लाखो शेतकऱ्यांवर सकारात्मक परिणाम झाला असून ग्रामीण कृषी क्षेत्रातील समृद्धीला लक्षणीय चालना मिळाली असल्याचे पुरस्कार समितीचे निष्कर्ष आहेत.कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण धोरणे आणि उच्च प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे.माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सथाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला 2024 सालचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इन मध्ये 15 व्या ‘एग्रीकल्चर लीडरशिप कोन्क्लेव्ह’मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. एग्रीकल्चर टुडे च्या वतीने या पुरस्काराची सुरुवात 2008 सालापासून करण्यात आलेली आहे.एग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेत प्रमुख भागधारकांचा मेळावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँड इत्यादी देशांचे राजदूत, तसेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड आदी राज्यांचे मंत्री यांचा समावेश असणार आहे.2008 साली या पुरस्काराची प्रथम सुरुवात करण्यात आली असून कृषी क्रांतीचे प्रणेते प्रा एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याला प्रदान केला होता. आतापर्यंत या पुरस्काराने माजी कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, अखिलेश यादव, दिवंगत नेते प्रकाश सिंह बादल, वर्गीस कुरियन, एम एस स्वामीनाथन इत्यादी महानुभावांचा गौरव करण्यात आलेला असून स्व. स्वामीनाथन यांनी दहा वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. तर सध्या डॉ. एम.जे. खान हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.2023 सालचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहार तर 2022 सालचा तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

  • Related Posts

    खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    Read more

    कापसाच्या हमीभावात 559 रुपये वाढ

    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    • May 28, 2025
    खरीप  पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    कापसाच्या हमीभावात 559 रुपये वाढ

    • May 28, 2025

    सोयाबीनला मिळणार 5328 रुपये हमीभाव

    • May 28, 2025

    मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

    • May 27, 2025
    • May 27, 2025

    30 मे पर्यंत राज्यात पाऊस पडणार

    • May 27, 2025