लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या कृषी धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या कृषी धोरणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. निती आयोग तसंच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या स्तरावर तशी तयारी सुरू आहे.

सध्या निती आयोगाकडून विद्यमान योजनांच्या प्रगतीचा मागोवा घेतला जात आहे. आवश्यक तेथे बदल  करण्यासाठी फ्लॅगशिप कार्यक्रमांचे मूल्यमापन हाती घेतलं गेलं आहे. निवडणुकांनंतर कृषी आणि ग्रामीण निर्देशांक सादर केला जाऊ शकतो. कृषी उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी नवं धोरण राबवलं जाणार आहे.

कृषी कायद्यांद्वारे या क्षेत्रातील सुधारणा लागू करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता निती आयोगाच्या माध्यमातून शेती धोरणात सुधारणांचा मार्ग अजमावला जात आहे. मुख्यत: शेतकऱ्यांना कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडं जाण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यातून शाश्र्वत शेतीचा मार्ग सुकर होईल.

याशिवाय, कृषी पुरवठा साखळीतील मध्यस्थ, दलाल आणि कमिशन एजंट कमी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या एकत्रिकरणावर भर दिला जाऊ शकतो.

  • Related Posts

    खुशखबर… आता साठवणुकीत कांदा खराब होण्याची कटकटच मिटली; काय आहे BARC, ‘इन्फ्राकूल’चे नवीन तंत्रज्ञान?

    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    • May 28, 2025
    खरीप  पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    कापसाच्या हमीभावात 559 रुपये वाढ

    • May 28, 2025

    सोयाबीनला मिळणार 5328 रुपये हमीभाव

    • May 28, 2025

    मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

    • May 27, 2025
    • May 27, 2025

    30 मे पर्यंत राज्यात पाऊस पडणार

    • May 27, 2025