1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीकविमा अर्ज दाखल,

राज्यात लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात भरला आपला पीकविमा – धनंजय मुंडे

15 जुलैला मुदतवाढ दिल्यानंतर 21 लाख 90 हजार अर्जांची वाढ!

पीक विम्यापोटी राज्य शासन भरणार 4725 कोटींचा हिस्सा

– खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जुलै रोजी संपुष्टात आली आहे. 31 जुलै अखेर राज्यातुन 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीकविमा अर्ज पीकविमा पोर्टलवर दाखल झाले असून याव्दारे लाखो शेतकऱ्यांनी आपले पीक केवळ 1 रुपया विमा हफ्ता भरून आपले पीक विमा संरक्षित केले असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा पोर्टलच्या वतीने सुरुवातीला 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बरेच शेतकरी तेव्हा विमा भरण्यापासून वंचित राहिल्याने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विनंती करून 31 जुलै पर्यंत मुदतवाढ करून घेतली होती. 15 जुलै नंतर अखेरपर्यंत 21 लाख 90 हजार अर्जांची त्यामुळे वाढ झाली आहे.

दरम्यान राज्यात एकूण 97टक्के पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 10 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. तर एकूण विमा संरक्षित रक्कम ही 53 हजार 886 कोटी इतकी आहे.

एकूण विमा हफ्ता हा सुमारे 7959 कोटी इतका निश्चित असून, त्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपया प्रमाणे 1 कोटी 65 लाख, राज्य हिस्सा एकूण 4725 कोटी, त्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा 3232 कोटी व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने भरावयाचा हिस्सा 1492 कोटी इतका निश्चित करण्यात आला असून केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सुमारे 1 कोटी 71 लाख विमा अर्ज दाखल झाले होते तर संपूर्ण हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विम्या पोटी आतापर्यंत 7280 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 4271 कोटी पिक विम्याचे वाटप पूर्ण झाले असून आणखी 3009 कोटी रुपयांचे वितरण सध्या सुरू असून अंतिम पीक कापणी अहवालाचे काम 100टक्के पूर्ण झाल्यानंतर या रकमेत आणखी वाढ होणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

  • Related Posts

    खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    Read more

    कापसाच्या हमीभावात 559 रुपये वाढ

    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    • May 28, 2025
    खरीप  पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    कापसाच्या हमीभावात 559 रुपये वाढ

    • May 28, 2025

    सोयाबीनला मिळणार 5328 रुपये हमीभाव

    • May 28, 2025

    मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

    • May 27, 2025
    • May 27, 2025

    30 मे पर्यंत राज्यात पाऊस पडणार

    • May 27, 2025