पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ हंगामासाठी १४ खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती (MSP) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.यात सोयाबीनला 5328 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. गतवर्षी सोयाबीनला 4892 रुपये होता. त्यात 436 रुपये वाढ करण्यात येऊन 5328 रुपये हमीभाव करण्यात आला आहे.


