नाफेडमार्फत आधारभूत दरानुसार होणार खरेदी

मका,तूर,चना,मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यात येणार

    :- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व नाफेड कार्यालय मुंबई यांचया संयुक्त विद्यामाने दरवर्षीप्रमाणे हंगाम 2024-25 मध्येही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका,तूर,चना, मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे.

    नाफेड कार्यालयाने गृह आणि सहकार मंत्री यांच्या हस्ते शेतक-यांच्या नोंदणीसाठी csamrjddhi पोर्टल सुरु केले असून नाफेड (NAFED) मार्फत राबविण्यात येणा-या सरकारी योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतक-यांपर्यत पोहचवा व जास्तीत जास्त शेतक-यांनी ई समृध्दी (escsamriddhi) पोर्टलवर नोंदणी करुन आपल्या शेतमालाला योग्य दर घ्यावा, याकरिता पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.

      तरी सर्व शेतक-यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामार्फत आवाहन करण्यात येते की, खालील दिलेल्या क्यूआर (QR) कोड स्कॅन (Scan) करुन अथवा https://esamridhi.in/#login या संकेत स्थळाला भेट देउुन आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृध्दी पोर्टलवर खरेदी पूर्व नोंदणी (pre-registration)  करावे व केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.

     ई-समृध्दी पोर्टलवरील नोंदणीच्या अडचणीबाबत व अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी NEML कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा.

                                                  ******

  • Related Posts

    खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    Read more

    कापसाच्या हमीभावात 559 रुपये वाढ

    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    • May 28, 2025
    खरीप  पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    कापसाच्या हमीभावात 559 रुपये वाढ

    • May 28, 2025

    सोयाबीनला मिळणार 5328 रुपये हमीभाव

    • May 28, 2025

    मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

    • May 27, 2025
    • May 27, 2025

    30 मे पर्यंत राज्यात पाऊस पडणार

    • May 27, 2025