कोंबडीच एक अंड सहा रूपयाला मिळतं. तर चिकन 200 रूपये पर्यंत मिळतं. पण, एक कोंबडी अशी आहे जिचं अंड 100 रुपयाला विकले जाते. त्यामूळे ही कोंबडी चर्चेत सध्या आली आहे. कोंबडीचे मांस आणि अंडी यातून मिळणारा फायदा लक्षात घेता त्यांना पाळणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. चला तर मग जाणून घेवूया एका अंड्याची किंमत बाजारात 100 रुपये असणाऱ्या या कोंबडीबद्दल..
आम्ही आज तुम्हाला अशा कोंबडीच्या प्रजातीचे नाव सांगणार आहे, ज्याची बाजारात खूप जास्त किंमत आहे. विशेष म्हणजे या प्रजातीच्या कोंबडीची किंमत कडकनाथपेक्षा जास्त आहे. होय, आपल्या देशात असील जातीची कोंबडी आहे. या असली कोंबडीचे एक अंडे 100 रुपयांना विकत घेतले जाते. या कोंबड्या अंडी उत्पादनाच्या दृष्टीने कमकुवत मानल्या जातात. कारण, त्या वर्षाला केवळ 60 ते 70 अंडी घालतात. या कोंबड्यांचे अंडे डोळ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.




