शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप” या बाबीचा पुरवठा

करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. 14 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कृषी यांत्रिकीकरण या अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

                                 

Share
  • Related Posts

    शेतकऱ्यासाठी खुशखबर 5 ऑक्टोबरला पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण

    Share
    Read more

    अखेर मुहूर्त ठरला

    Share
    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेतकऱ्यासाठी खुशखबर 5 ऑक्टोबरला पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण

    • October 3, 2024

    अखेर मुहूर्त ठरला

    • September 18, 2024

    शेतकऱ्यासाठी खुशखबर

    • September 8, 2024

    कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर

    • September 2, 2024

    कापूस सोयाबीन आणि कांद्याच्या प्रश्न केंद्र राज्याच्या पाठीशी; केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण

    • August 21, 2024

    परळीच्या कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांचा होणार फायदा

    • August 21, 2024