विशाखापट्टणममधील आंध्र विद्यापीठाच्या पडीक जमिनीत दोघा मैत्रिणींनी नैसर्गिक शेतीतून सुंदर, विलोभनीय अन् आकर्षक लोकबगीचा फुलवला आहे. विद्यापीठातील अवनी ऑरगॅनिक्स गार्डनिंग हब आता एका समृद्ध नैसर्गिक शेतात विकसित झाले आहे. पडीक जमिनीला हिख्यागार पट्ट्यात बदल ल्यामुळे शहरी रहिवाशांसाठी आता एक सामुदायिक क्रिया स्थळ बनले आहे. नागरिक, मुले या कम्युनिटी फार्म, ओपन गार्डनमधून शेती- मातीचे तंत्र समजून घेत आहेत.