राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दुध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीत दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने राज्यातील सहकारी दुध उत्पादक संघ खाजगी प्रकल्प यांना गाय दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर रुपये 5/ ₹ अनुदान व दूध भुकटी निर्यातीस रू.30₹ प्रती किलो प्रोत्साहानपर अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय दि. 5.07.2024 रोजी निर्गमीत करण्यात आला आहे. त्यानुसार सदर अनुदान योजना दि. 01 जुलै 2024 ते दि.30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे.सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष सॉफटवेअर तयार करण्यात आले असून अनुदान पात्र गायप्रति लिटर रुपये 5/-₹अनुदान दुध उत्पादक शेतक-यांच्या बैंक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) व्दारे जमा करण्यात येणार आहेत. (डीबीटी) करण्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बैंक खाते, आधारकार्ड व ई एआर (EAR) टॅगशी जोडलेले असणे तसेच त्याची आयएनएचीएच (INAPH) भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. शेतकरी आयडी संदर्भात मोबाईल मधिल प्ले स्टोअर वर 1962 नावाचे अॅप डाउनलोड करावे. सदर ॲप शेतक-याचे नाव अथवा मोबाईल नंबर टाकल्यास शेतक-याचा आयडी उपलब्ध होतो.
सहकारी दूध उत्पादक संघ व खाजगी प्रकल्प, शितकरण केंद्रे आणि फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी यांना योजनेत सहभागी होण्याकरिता आयुक्त, दुग्ध व्यवसाय विकास विभाग, मुबंई यांना अर्ज करणे बंधनकारक आहे. सदर अर्ज सादर करतांना संघ व खाजगी दुध प्रकल्पांनी संदर्भीय शासन निर्णयानुसार अर्ज करण्यात यावे.
शासनाच्या रु 5/₹अनुदान योजनेपासून सर्व जिल्हयातील दुध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये.यासाठी दुध उत्पादक शेतक-यांनी सहकारी संघ व खाजगी दुग्ध प्रकल्पांशी संपर्क साधुन आवश्यक कागदपत्रे सदरील संघ किवा खाजगी प्रकल्पास देण्यात यावीत.
तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत बीड जिल्हयातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाय यांचे (Ear) ईयर टॅगिंग करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी सर्व दुध उत्पादक शेतकरी यांनी आपापल्या जिल्हयातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. याव्दारे सहकारी संघ व खाजगी दुग्ध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादकांनी प्रकल्पांना आवश्यक माहिती देवून आपल्या जनावरांचे टेंगींग करुन घेवून शासनाच्या सदर योजनेचा लाभ घेता येईल.