जम्मू आणि काश्मीरमधील कृषी विद्यापीठं शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांच्या प्रचार-प्रसारात, तसंच ब्रँड तयार करण्यात मदत करत आहेत. या केंद्रशासित प्रदेशातील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि कृषी तंत्रज्ञान विद्यापीठांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
काश्मीर खोऱ्यातील कृषी क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी आणि इथल्या शेतकरी समुदायाच्या उन्नतीसाठी, महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. फलोत्पादन, नियोजन आणि विपणन विभागाच्या सहकार्याने दोन कृषी ब्रँडिंग केंद्र म्हणजेच ABC स्थापन केली गेली आहेत.
केवळ पायाभूत सुविधांच्या पलीकडे, ही केंद्रे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याच्या जटिल प्रक्रियेत मार्गदर्शन करत आहेत. त्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था, IIT आणि भारतीय व्यवस्थापन संस्था, IIM यांचे तज्ञ मार्गदर्शन करत आहेत.