शेतकरी पुरस्कार सोहळा 29सप्टेंबर रोजी मुंबईत
कृषी विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कार कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली. राज्यपाल महोदयांनी या कार्यक्रमाला येण्याचे तत्वतः मान्य केले असून येत्या 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे. मागील तीन वर्षाचे कृषी पुरस्कार या समारंभात वितरित केले जाणार आहेत.
यावेळी माननीय राज्यपाल महोदयांसोबत कृषी विभागाच्या विविध योजनां, कृषी विद्यापीठे आदींसंदर्भात सखोल चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनीही अनेक विधायक सूचना केल्या आहेत.